महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांचा मानबिंदू असणाऱ्या आणि ” *वक्तृत्व पंढरी”* म्हणून ओळख असणाऱ्या *आंतरमहाविद्यालयीन कविवर्य मोरोपंत वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धां* चे आयोजन आमचे *तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती* गेल्या 51 वर्षांपासून करत आहे. या वर्षी या स्पर्धांचे आयोजन *शुक्रवार, 14 नोव्हेंबर व शनिवार, 15 नोव्हेंबर, 2025* रोजी करण्यात येत आहे. स्पर्धेच्या विजेत्यांना एक लाख रुपयांपेक्षा अधिकच्या रकमेची रोख पारितोषिके, तसेच चांदीच्या फिरत्या ढाली, स्मृती चिन्हे दिली जातात. महाराष्ट्रातील अनेक नामवंत व्यक्तिमत्व ज्यात श्री अविनाश धर्माधिकारी (IAS), प्रसिद्ध विचारवंत हरि नरके, कवयित्री अरुणा ढेरे, फिल्म निर्देशक परेश मोकाशी, प्रसिद्ध पत्रकार समिरण वाळवेकर हे या स्पर्धेचे काही माजी विजेते आहेत. आपले कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा व वरिष्ठ गटातील विद्यार्थी वक्तृत्व, वादविवाद आणि उत्स्फूर्त वक्तृत्व या तीन प्रकारात भाग घेऊ शकतात. स्पर्धेचे हे माहितीपत्रक आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे, ही आपणास विनंती!! अधिक माहितीसाठी पत्रकात दिलेल्या QR Code ला स्कॅन करून विद्यार्थी संबंधित ग्रुप ला जॉईन होऊ शकतात.
कनिष्ट गटासाठी 11 वी आणि 12 वी चे कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त दोन विद्यार्थी येऊ शकतात.
वरिष्ट गटात एका महाविद्यालयातील जास्तीत जास्त 2 विद्यार्थी येऊ शकतात. हेच किंवा इतर दोन विद्यार्थ्यांचा संघ वादविवाद स्पर्धेसाठी येऊ शकतो.
वरिष्ठ गटातील वक्तृत्व आणि वाद विवादाचे स्पर्धक उत्स्फूर्त स्पर्धेत भाग घेऊ शकतात. उत्स्फूर्त स्पर्धेत केवळ वरिष्ठ गटातील स्पर्धक येऊ शकतात, ही स्पर्धा कनिष्ट गटासाठी नाही. उत्स्फूर्त स्पर्धेसाठीचा सहभाग ऐच्छिक असतो, तसेच त्यासाठी नोंदणी शुल्क वेगळे असते.
वक्तृत्व स्पर्धा कनिष्ट संघ – नोंदणी शुल्क 200 रुपये
वक्तृत्व स्पर्धा वरिष्ठ संघ- नोंदणी शुल्क 200 रुपये
वादविवाद स्पर्धा वरिष्ठ संघ- नोंदणी शुल्क 200 रुपये
उत्स्फूर्त स्पर्धा वैयक्तिक- नोंदणी शुल्क 100 रुपये.
© 2025 Tuljaram Chaturchand College. All Rights Reserved.
Design & Developed by PitchTeQ