Anekant Education Society's

Tuljaram Chaturchand College of Arts, Science & Commerce, Baramati.

Affiliated to Savitribai Phule Pune University Re-Accredited by NAAC 'A+' Grade (CGPA 3.55) ISO 9001-2008 Certified
College With Potential For Excellence(CPE) Religious Minority Institute DST FIST 'O' Level

माहितीपत्रक ऑनलाईन मिळण्यासाठीच्या सुचना पुढील प्रमाणे:

१) महाविद्यालयाच्या www.tccollege.org या वेबसाईटवर जाऊन वेबसाईट च्या होम पेज वरच CLICK HERE FOR ONLINE PAYMENT या बटन वर क्लिक करावे.

२) वरील होम पेज च्या लिंक वर गेल्या नंतर येणाऱ्या फोर्म वर स्वतः ची पूर्ण माहिती, ई-मेल आयडी, फोन नंबर भरावे त्यानंतर Proceed to Pay बटन वर क्लिक करावे. त्या पुढील पेज वर गेल्यानंतर Select Your Fee च्या पुढे Prospectus Fee असे सिलेक्शन करावे व त्या नंतर विनाअनुदानीत विभागाच्या माहितीपत्रकाची असलेली प्रवेश फी रुपये १५०/- येईल आणि अनुदानीत विभागाच्या माहितीपत्रकाची असलेली प्रवेश फी रुपये २०/- येईल त्यानंतर Pay या बटन या बटनवर क्लिक करावे.

३) त्या नंतर विद्यार्थ्याने Credit Card (पेमेंट गेटवे चे चार्जेस १.३५% ज्यादा) किंवा Debit Card (पेमेंट गेटवे चे चार्जेस १.१५% ज्यादा) किंवा Net Banking (पेमेंट गेटवे चे चार्जेस २०/- रुपये ज्यादा) किंवा UPI या पैकी एक पर्याय निवडून Online Payment करावे.

४) विद्यार्थ्याने माहितीपत्रकाचीफी ऑनलाइन पद्धतीने भरल्यानंतर मिळणारी रिसीट महाविद्यालयाच्या onlinepayment.tcc@gmail.com या मेल वर पाठविणे बंधनकारक राहील.

५) महाविद्यालायाला ई-मेल व्दारे रिसीट मिळाल्यानंतर त्याच मेल ला महाविद्यालायाचे माहितीपत्रक व अप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी लागणारी माहिती कार्यालयीन वेळेमध्ये त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पाठविली जाईल.

प्रवेश फी ऑनलाईन भरण्यासाठीच्या सुचना पुढील प्रमाणे :

१) विद्यार्थ्याने सर्व कागदपत्रांची पूर्तता करून प्रशासन भवनामध्ये कागदपत्र जमा करून चलन काढून घ्यावे. सदर चलन विद्यार्थ्याने कॉर्पोरेशन बँकेमध्ये जावून भरावे किंवा महाविद्यालयाच्या www.tccollege.org या वेबसाईटवर जाऊन वेबसाईट च्या होम पेज वरच CLICK HERE FOR ONLINE PAYMENT या बटन वर क्लिक करून प्रवेश फी ऑनलाईन पद्धतीने भरावी.

२) वरील होम पेज च्या लिंक वर गेल्या नंतर येणाऱ्या फोर्म वर स्वतः ची पूर्ण माहिती, ई-मेल आयडी, फोन नंबर भरणे. त्यानंतर Proceed to Pay बटन वर क्लिक करावे. त्या पुढील पेज वर गेल्यानंतर Select Your Fee च्या पुढे Admission Fee असे सिलेक्शन करावे व त्या नंतर Amount च्या पुढे महाविद्यालयाने दिलेल्या चलनावर असलेली प्रवेश फी ची रक्कम त्यामध्ये लिहावी व Pay या बटनवर क्लिक करावे.

३) त्या नंतर विद्यार्थ्याने Credit Card (पेमेंट गेटवे चे चार्जेस १.३५% ज्यादा) किंवा Debit Card (पेमेंट गेटवे चे चार्जेस १.१५% ज्यादा) किंवा Net Banking (पेमेंट गेटवे चे चार्जेस २०/- रुपये ज्यादा) किंवा UPI या पैकी एक पर्याय निवडून Online Payment करावे.

४) जर महाविद्यालयाने दिलेल्या चलनावरील रक्कम आणि विद्यार्थ्याने महाविद्यलाच्या खात्यामध्ये Online पद्धतीने भरलेली प्रवेश फी ची रक्कम यात तफावत असल्यास विद्यार्थ्याचा प्रवेश ग्राह्य धरला जाणार नाही. विद्यार्थ्याने भरलेली फी रक्कम महाविद्यालयाकडून प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर त्यास परत मिळेल याची नोंद घ्यावी.

५) विद्यार्थ्याने प्रवेश फी ऑनलाइन पद्धतीने भरल्यानंतर मिळणाऱ्या रिसीट ची प्रिंट दोन प्रतींमध्ये काढून महाविद्यालयामध्ये जमा करावी व त्यासोबत महाविद्यालयाने दिलेले चलन देखील जोडने बंधनकारक राहील.

Pay Now

| Home | How to Reach | Sitemap | Contact Us | Admin |
Copyright © Computer Science Department. All Rights Reserved. - Tuljaram Chaturchand College of Arts,Science & Commerce, Baramati